लोणी काळभोर प्रतिनिधी – चंद्रकात दुंडे : शिरूर हवेली मतदारसंघातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत या ठिकाणी सुरू असणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलजीवन मिशन योजनेत घोटाळा झाला आहे असा आरोप कदमवाकवस्ती माजी सरपंच देविदास काळभोर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हवेली तालुका समन्वय समितीच्या बैठकीत केला आहे,याला दुजोरा देत आमदार अशोक पवार यांनी एम जी पी चे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांना सदरील कामाच्या चौकशीची व चौकशी पूर्ण होईपर्यंत हे काम बंद ठेवावे अशी मागणी केली.त्याचसोबत विविध आरोपांमध्ये कॉन्ट्रॅक्टरचा नंबर सार्वजनिक का करत नाही? चित्तरंजन गायकवाड व प्रीतम गायकवाड यांनी आपली वैयक्तिक पाईप लाईन यामध्ये केलेली आहे व सदरील काम फक्त वार्ड क्रमांक १ व ६ मध्ये सुरू असून अजून वार्ड क्रमांक २,३,३,४,५ मध्ये सर्वे देखील झालेला नाही.याला प्रतिउत्तर देताना नवपरिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी सांगितले की कॉन्ट्रॅक्टर चा नंबर घेऊन आमदारांच्या बगलबच्यानां काम पाहिजे का दाम पाहिजे.हा नंबर घेऊन हे लोक सुरू असलेली ही चांगली योजना बंद करतील अन्यथा या कॉन्ट्रॅक्टदाराला पैसे मागतील.विशेष म्हणजे कार्यक्षम आमदार यांना आपल्या मतदार संघात नेमके कोणती कामे कोणत्या कॉन्ट्रॅक्टदाराकडे आहे याची देखील माहिती नसेल तर हे अतिशय निंदनीय आहे.
यावरून कळते की आमदारांनी किती विकास या भागात केलेला आहे.त्याचसोबत शेतकऱ्यांचा कळवळा असणाऱ्या आमदारांनी एका शेतकऱ्याच्याच पाईप लाईनला विरोध करत असतील तर ती मी उद्या काढून टाकतो.२०१२ साली दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना त्रिंबक सर्जेराव गायकवाड व सरस्वती त्रिंबक गायकवाड या शेतकऱ्यांनी पांडवदंड आणि फुरसुंगी मधील काही भागाला आपल्या शेतातील चालू पिके जाळून पाणी पुरवठा केलेला आहे.त्याचसोबत याठिकाणी प्रत्येक वॉर्डातील सदस्य असून त्यांच्या उपस्थितीत प्रत्येक वार्डाचे सर्वेक्षण केव्हाच पार पडले आहे याची विचारणा तुम्ही सदरील सदस्यांना करू शकता.
खरे बोलायचे झाले तर विद्यमान आमदार यांनी आमच्या भागात गरजेप्रमाणे विकास कामे न केल्याने या कामाचे श्रेय लाटण्याचे काम सध्या ते करत आहेत.तरी मी आमदारांना सांगू इच्छितो की येथील जनतेला मी पाण्याचा थेंब कमी पडू देणार नाही व ही योजना कसल्याही परिस्थीत पूर्ण करून दाखवेल.जर येत्या काही दिवसात काम सुरू झाले नाही तर मी व माझी पत्नी आमरण उपोषण करणार आहे. तसेच दोन नंबर वार्ड मधील सामाजिक कार्यकर्ते तुषार मोहन काळभोर यांनी आरोप केला की आमदारांनी रस्त्यासाठी आमच्या वार्डात जो दहा लाखांचा निधी दिला आहे तो केवळ खाजगी मोबाईल टॉवर कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी दिला आहे.
विद्यमान आमदारांना शिरूर मधील कारखान्यांच्या व्यवस्थेमधील वापरला जाणारा घोटाळा या शब्दाची सवय झाल्याने त्यांना या योजनेत देखील घोटाळा दिसत आहे. – गौरी गायकवाड , माजी सरपंच कदमवाकवस्ती.