अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं ; भिडे गुरुजींची आक्रमक प्रतिक्रिया

राज्यभर गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. खरातने अनेक पिडीत महिलांचं लैंगिक शोषण केलं असल्याची, त्याचबरोबर अनेक धमकावून जमीनी मालमत्ता घेतल्या असल्याचं, त्याचबरोबर फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे.

अनेक नेत्यांचे आणि बड्या अधिकाऱ्यांचे भोंदूबाबा अशोक खरात सोबत चांगलं कनेक्शन होते, अनेक नेत्यांच्या घरी तो जात होता, अनेक नेते त्याच्या भेटीसाठी येत होते, त्याचे फोटो देखील समोर आले आहेत, यावरून वातावरण तापलं असतानात आता या संपूर्ण प्रकरणावरती भिडे गुरुजींनी प्रतिक्रिया दिली आहे.”अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं, खरात प्रकरणावर चर्चा सुद्धा करू नये”, नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर भिडे गुरुजी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.भोंदू बाबा अशोक खरातच्या संस्थांचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे, त्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे.विशेष तपास पथकाकडून मालमत्तेची माहिती मागवली आहे. कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरू आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास सुरू आहे. बेनामी मालमत्ता असल्याचा संशय आहे, पुढील 2-3 दिवसांत तपासाला वेग येणार आहे.