
अर्थसंकल्पीय अधिवेशनापुर्वी राजकारणात मोठा भूकंप, राजकीय वर्तुळात खळबळ, मुख्यमंत्री अस्वस्थ

अमृतसर – अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दिल्लीची सत्ता गमावली आहे. पण आता पंजाबमध्येही पक्षाला हादरे बसण्याची शक्यता आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते प्रताप सिंग बाजवा यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पंजाबमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये देखील आपचे सरकार आहे. पण आता दिल्ली पराभवानंतर पंजाबमध्ये देखील पक्षातील पराभवानंतर आमदार अस्वस्थ झाले आहेत. आम आदमी पक्षाचे ३२ आमदार काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक आहेत. ते संपर्कात आहेत, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा यांनी केला आहे. ते म्हणाले पंजाबमधील सरकारनं कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. सरकारने कोणतेही आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे या आमदारांना आपल्या भविष्याची चिंता सतावत आहेत. त्यामुळे पक्षातील ३२ आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षातील अनागोंदी देखील समोर आली आहे. भगवंत मान यांच्या सरकारमधील एका मंत्र्याकडे जे खातं देण्यात आलं होतं, ते खातं अस्तित्वातच नव्हतं अशी धक्कादायक माहिती समोर आली. एवढंच नव्हे तर २१ महिने त्या खात्याचे मंत्री म्हणून मंत्री कुलदीप सिंग धालीवाल यांनी काम देखील पाहिलं. या प्रकारावरून पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ते सरकारमध्ये प्रशासकीय सुधारणा विभाग मंत्री होते. पण तसे कोणते पदच नसल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वात पंजाबमध्ये ‘आप’चं सरकार सत्तेत आहे. मात्र, मुख्यमंत्री भगवंत मान हे दिल्लीच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे आपचे आमदार चिंतेत आहेत. दरम्यान राज्यातील भगवंत मान सरकारला हे विधानसभा अधिवेशन फार दिवस चालू द्यायचं नाही. भीतीपोटी आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री बदलायचा आहे, असा दावा बाजवा यांनी केला आहे.
पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, असा दावा काँग्रेस आणि भाजपने अलीकडेच केला होता. पंजाबमध्ये पोटनिवडणूक लढून त्यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हायचं आहे, असा दावा केला जात आहे. त्यामुळे राज्यात राजकारण तापले आहे.









