
दोन वर्षानंतर रेडीरेकनर दरांमध्ये वाढ, पहा तुमच्या जिल्ह्यात किती झाली वाढ?

पुणे – पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी आपले घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण आता हक्काचं घराचं स्वप्न आता आणखी महाग झाले आहे. रेडी रेकनर रेटमध्ये वाढ केल्याने घराच्या किमती वाढल्या आहेत.

राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनरमध्ये (खरेदी-विक्रीचे व्यवहाराचे) वाढ केली आहे. यामुळे पुण्यात देखील घरांच्या किमती वाढल्या आहेत. पुण्यात रेडीरेकनरमध्ये ४.१६ आणि पिंपरी चिंचवडमध्ये ६.६९ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घर घेण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. रेडीरेकनर दर दोन वर्षांनी वाढले आहेत. त्यामुळे पुण्यातील घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. रेडी रेकनरच्या दरात मुंबईवगळता राज्यात सरासरी ४.३९ टक्के वाढ केली आहे. गेली तीन वर्षे रेडी रेकनरच्या दरात राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. शहरी भागात ही वाढ ५.९५ टक्के तर ग्रामीण भागात ही वाढ ३.३६ टक्के असणार आहे.
कोरोना महामारीचा मालमत्ता बाजारपेठेवर परिणाम झाल्याने राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांत रेडी रेकनरच्या दराची फेररचना केली नव्हती. सध्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यातच राज्य सरकारला मुद्रांक शुल्क आणि नोंदणीच्या माध्यमातून अधिक महसुलाची अपेक्षा आहे. आता रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ झाल्याने मालमत्तांचे दर वाढणार असून घर खरेदीदारांवर त्याचा अधिक बोजा पडणार आहे. रेडी रेकनर रेट म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील मालमत्तेसाठी निश्चित केलेले किमान मूल्य असते, याला सर्कल रेट असेही म्हणतात. विविध भागात हे दर वेगवेगळे असतात.
शहर आणि रेडीरेकनर दर
पुणे – 4.16
पिंपरी चिंचवड – 6.69
ठाणे- 7.72
मीरा भाईंदर -6.26
कल्याण – डोंबिवली – 5.84
नवी मुंबई -6.75
उल्हासनगर – 9
वसई – विरार – 4.50
पनवेल – 4.97
सांगली – मीरज – कुपवाड – 5.70
कोल्हापुर – 5.1
इचलकरंजी – 4.46
सोलापुर -10.17
नाशिक – 7.31
संभाजी नगर – 3.53
नागपुर -4.23
अहिल्यानगर – 4.41
धुळे – 5.7
मालेगाव -4.88
नागपूर एन एम आर डी ए – 6.60
अमरावती – 8.3
अकोला – 7.39
लातुर -4.1
परभणी – 3.71









