शूटर मनु भाकरसह हा तरुण खेळाडूला अर्जुन पुरस्काराची घोषणा

दिल्ली – भारत सरकारने राष्ट्रीय क्रिडा पुरस्कारासाठी निवडलेल्या खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. शूटर मनु भाकर आणि वर्ल्ड चेस चॅम्पियन डी. गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ऍथलीट प्रवीण कुमार या चार खेळाडूंना खेल रत्न पुरस्कार मिळणार आहे.

मनु भाकरने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आयोजित पॅरिस ऑलिम्पिक गेम्समध्ये दोन ऑलिम्पिक पदक जिंकले होते. बुद्धिबळपटू गुकेशने सर्वात तरुण विश्वविजेता बनून चर्चेत आले. गेल्या वर्षी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देणारा हा १८ वर्षीय खेळाडू सर्वात तरुण विश्वविजेता ठरला होता. तर हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक आणि एशियन गेम्स २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकले. तसेच, हरमनप्रीतने तीन वेळा एफआयएच अवॉर्ड्समध्ये प्लेयर ऑफ द ईयरचा किताब जिंकला आहे. चौथ्या विजेत्या प्रवीण कुमारला पॅरिस पॅरालिम्पिकमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले, जिथे त्याने टी ६४ प्रकारात उंच उडीचे विजेतेपद पटकावले होते. दरम्यान यावेळी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही. त्याचबरोबर प्रशिक्षकांच्या श्रेणीतही क्रिकेट संबंधित कोणत्याही व्यक्तीचे नाव सामील नाही.

अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंची नावे –
1. ज्योति याराजी (अ‍ॅथलेटिक्स)
2. अन्नू रानी (अ‍ॅथलेटिक्स)
3. नीतू (बॉक्सिंग)
4. स्वीटी (बॉक्सिंग)
5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
6. सलीमा टेटे (हॉकी)
7. अभिषेक (हॉकी)
8. संजय (हॉकी)
9. जरमनप्रीत सिंग (हॉकी)
10. सुखजीत सिंग (हॉकी)
11. राकेश कुमार (पॅरा नेमबाजी)
12. प्रीति पाल (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
13. जीवनजी दीप्ति (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
14. अजीत सिंह (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
15. सचिन सरजेराव खिलारी (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
16. धरमबीर (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
17. प्रणव सूरमा (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
18. एच होकाटो सेमा (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
19. सिमरन जी (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
20. नवदीप (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
22. तुलसीमथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
23. नित्या सुमति सिवान (पॅरा बॅडमिंटन)
24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
25. कपिल परमार (पॅरा जूडो)
26. मोना अग्रवाल (पॅरा शूटिंग)
27. रुबीना फ्रांसिस (पॅरा शूटिंग)
28. स्वप्निल सुरेश कुसाले (शूटिंग)
29. सरबजोत सिंह (शूटिंग)
30. अभय सिंह (स्क्वॅश)
31. साजन प्रकाश (जलतरण)
32. अमन (कुस्ती)
द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी)
1. सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
2. दीपाली देशपांडे (शूटिंग)
3. संदीप सांगवान (हॉकी)