बोलत नसल्याचा मनात राग ; तरुणाने केले महिलेचे अश्लील फोटो व्हायरल..

बोलत नसल्याचा राग मनात धरून एका तरुणाने महिलेसोबत काढलेले दोघांचे अश्लील फोटो व्हायरल करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी दि.२५ रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी ३३ वर्षीय तरुणावर आयटी अ‍ॅक्ट व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ३२ वर्षीय महिलेने बुधवारी दि.२६ रोजी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सागर महादेव काळे याच्यावर आयपीसी ३५४ ,५०६ , आयटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी पूर्वी हडपसर परिसरात एकाच परिसरात राहत होते. त्यामुळे ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यानंतर महिलेने घर बदलून दुसरीकडे राहायला गेली. त्यामुळे त्यांच्या बोलणे होत नव्हते.

महिला बोलत नसल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्याने हडपसर परिसरात राहत असताना दोघांचे एकत्रित काढलेले अश्लील फोटो महिलेला व तिच्या पतीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून व्हायरल करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत महिलेने जाब विचारला असता त्याने अजून अश्लील फोटो सर्वांना पाठवून बदनामी करणार असल्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.