
स्वारगेट एसटी स्टँड व पीएमपीएमएल बस स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना स्वारगेट पोलिसांनी आंतरराज्यीय टोळाचा पर्दाफाश केला आहे. आरोपींकडून १२० मोबाईल व तीन लॅपटॉप असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

इम्रान ताज शेख आणि ऊसामा शफिक शेख, आबिद मुकीम पटेल, अख्तर अली रबियल खान अशी आरोपींची नावे आहेत. यामध्ये आणखीन तीन आरोपी निष्पन्न झाले आहेत. आरोपी इम्रानवर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये १० गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी ऊसामा शेख याला ताब्यात घेऊ चोकशी केली. खरेदी केलेल्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर मारुन ते मोबाईल पुढे मुंबई येथील एजंट आबिद व अख्तर यांना विकल्याचे सांगितले. पथकाने मुंबई येथे जाऊन एजंट आबिद व अख्तर यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून १२ लाखांचे १२० मोबाईल, एक लाख रुपये किमतीचे तीन लॅपटॉप, सॉफ्टवेअर मारण्याचे तीन डिव्हाईस असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले करीत आहेत.









