महादेवीमुळे अंबानीच्या रिलायन्स आणि जिओची कोंडी

‘महादेवी’साठी सगळे एकवटले, राष्ट्रपतींना साकडे, मुक पदयात्रेचे आयोजन, नेमक काय घडतय प्रकरण काय?

कोल्हापूर – कोल्हापूरतील नांदणी गावातील महादेवी उर्फ माधुरी हत्तिणीला वनतारा येथे नेण्यात आले आहे. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या हत्तिणीला नेल्यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी हत्तिणीला परत आणण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी बहिष्काराचा वापर करण्यात येत आहे.

माधुरी उर्फ महादेवी मागील ३२ वर्षापासून नांदणी येथे होती. या हत्तीणीला नेल्यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांना अश्रू अनावर झाले होते. गावकऱ्यांनी हत्तीणीला परत आणण्याचा निश्चय केला आहे. हत्तीणीला वनतारामध्ये नेल्यानंतर आता गावकऱ्यांनी जिओवर बहिष्कार टाकला आहे. अनेक गावकऱ्यांना जिओचे सिम कार्ड पोर्ट करण्यास सुरु केले आहे. महादेवी हत्तीणीला वनतारा केंद्रात नेण्याच्या निर्णयाविरोधात निषेध नोंदवला आहे. जवळपास ७००० गावकऱ्यांनी जिओ कंपनीचे सिम कार्ड पोर्ट केले आहे. हा केवळ व्यावसायिक निर्णय नव्हता. तर गावकऱ्यांचा भावनांचा उद्रेक आहे, अशा शब्दात गावकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. तसेच आता जिओच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबर अंबानींच्या सर्व उत्पादनांवरही बाहीष्कराचा नारा देण्यात आला.यामुळे रिलायन्स उद्योग समूहातील जिओ पेट्रोल पंप यासह अनेक संस्थेशेजारी पोलिसांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावल्यावचं पाहायला मिळत आहे. या प्रकारानंतर वनतारा संग्रहालय व्यवस्थापनाने दखल घेतली असून महादेवीला परत देण्यास सकारात्मका दर्शविली आहे.

नांदणी मठात हत्तीण ठेवण्यास प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेने आक्षेप घेतला. हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला न्यायालयाने महादेवीची पाठवणी वनतारा केंद्रात करण्याचा आदेश दिला. मात्र, तिला घेऊन जाण्यासाठी पोहोचलेल्या पथकाला गावकऱ्यांनी विरोध केला. अखेर कायद्याचा बडगा दाखवत महादेवीला ताब्यात घेण्यात आले होते.