फोर्ब्सकडून भारतातील श्रीमंताची यादी जाहीर हे दहा उद्योगपती सर्वात श्रीमंत, जगात मात्र मस्कचा दबदबा
मुंबई – जगात सगळ्यात श्रीमंत कोण आहे किंवा भारतात श्रीमंत कोण आहे? याबद्दल अनेकांना कुतुहल असते. फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. त्याबरोबर भारतातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींची माहिती समोर आली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे ९.५ लाख कोटी रुपये आहे. त्याचबरोबर ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. या यादीत गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अदाणींची संपत्ती सुमारे ८४ अब्ज रुपये आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी एचसीएल टेकचे संस्थापक शिव नाडर आहेत, त्यांची संपत्ती सुमारे ३६.९ अब्ज आहे. तसेच भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल चौथ्या क्रमांकावर आहेत, त्यांची संपत्ती
३३.५ अब्ज आहे. तर पाचव्या क्रमांकावर दिलीप शांगवी (सन फार्मा), सहाव्या क्रमांकावर सायरस पूनावाला (सेरम इन्स्टिट्यूट), सातव्या क्रमांकावर कुशल पाल सिंग (डीएलएफ), कुमार मंगलम बिर्ला (आदित्य बिर्ला ग्रुप) आठवा क्रमांक, राधाकिशन दमानी (डीमार्ट) नवव्या क्रमांकावर आणि दहाव्या स्थानावर लक्ष्मी मित्तल (आर्सेलर मित्तल) आहेत. विशेष म्हणजे अंबानी आणि अदाणी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या २५ जणात सामील झाले आहेत.
जागतिक पातळीवर एलन मस्क हे यादीत अव्वल स्थानावर आहेत. एलोन मस्क यांची एकूण संपत्ती 292.1 अब्ज डॉलर्स आहे तर दुसऱ्या क्रमांकावर अमेझॉनचे जेफ बेझोस आहेत. त्यांची एकूण संपत्ती $204.3 अब्ज आहे. तिस-या क्रमांकावर मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आहेत. त्यांची एकूण संपत्ती 191.9 अब्ज डॉलर्स आहे.