रस्त्यावरुन मोबाईलवर बोलत जाणार्यांच्या हातातील महागडे मोबाईल हिसकावून चोरणार्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ लाख ८५ हजार रुपयांचे ७ महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत. अझर आलम अन्सारी (वय २१) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
दिगंबर दराडे हे कात्रज तलावाकडून उत्कर्षनगरकडे जाणार्या रोडवर २८ सप्टेबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता पायी वॉकिंग करत होते. त्यावेळी मागाहून दुचाकीवर असलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या हाताील मोबाईल हिसका मारुन चोरुन नेला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी अझर अन्सारी याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अझरचा शोध घेऊन त्याला अटक केली. तपासादरम्यान आरोपीकडून १ लाख ८५ हजार रुपयांचे ७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील दोन तर, कोंढवा पोलीस ठाण्यातील एक असे तीन गुन्हे उघडकीस आले असून अन्य मोबाईल फोनबाबत तपास चालू आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुकत प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील, गुन्हे निरीक्षक शरद झिने, सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमाले, अवधुत जमदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, मंगेश पवार, निलेश जमदाडे, सतीश मोरे, नवनाथ भोसले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांनी केली आहे