
मुंबई – राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर ८ दिवसांनी मंत्र्यांचे खातेवाटपही पार पडले. त्यानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद अध्यक्ष यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांपैकी कुणाला कुठला बंगला मिळाला याची माहिती देण्यात आली आहे.

फडणवीस सरकारचा १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार झाला असून मंत्रिमंडळात एकूण ३३ मंत्री आणि ६ राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पहा कोणाला कोणता बंगला
राहुल नार्वेकर – शिवगिरी
राम शिंदे – ज्ञानेश्वरी
चंद्रशेखर बावनकुळे- रामटेक
राधाकृष्ण विखे पाटील- रॉयलस्टोन
पंकजा मुंडे- पर्णकुटी
शंभूराज देसाई-मेघदूत
गणेश नाईक-पवनगड
धनंजय मुंडे-सातपुडा
चंद्रकांत पाटील-सिंहगड
गिरीश महाजन-सेवासदन
मंगलप्रभात लोढा-विजयदुर्ग
अशोक उईके- लोहगड
आशिष शेलार-रत्नशिषु
दत्तात्रय भरणे- सिद्धगड
आदिती तटकरे-प्रतापगड
शिवेंद्रराजे भोसले- पन्हाळगड
मणिकराव कोकाटे-अंबार
जयकुमार गोरे-प्रचितीगड
नरहरी झिरवाळ-सुरुची
संजय सावकारे-अंबर ३२
संजय शिरसाठ-अंबर ३८
प्रताप सरनाईक-अर्वतो ५
भरत गोगावले-सुरुची २
मकरंद पाटील-सुरुची ३
गुलाबराव पाटील-जेतवन

मंत्री आणि दालन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दालन क्रमांक चारमध्ये बसून त्यांचं कामकाज करतील. तर एकनाथ शिंदे यांना दालन क्रमांक नऊ, अजित पवारांना दालन क्रमांक एक देण्यात आलं आहे. जयकुमार रावल, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ यांना अनुक्रमे पाच, दोन, तीन व चार क्रमांकाचं दालन देण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटील यांना १०१, पंकजा मुंडे यांना १०२, गिरिश महाजन यांना १०३, चंद्रशेखर बावनकुळे यांना १०४,आशिष शेलार यांना १०६, अशोक उईके यांना १०५ व मंत्री उदय सामंत यांना २०५ क्रमांकाचं दालन देण्यात आलं आहे.









