लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्याने काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. दरम्यान अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी शरद पवार यांची ‘मोदीबाग’ या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचे बंधू डॉ. अमोल बेनके, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या असल्याने या भेटींना आणखी महत्व प्राप्त झाले आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह भाजपच्या काही नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शेकापचे जयंत पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली.शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर रविकांत तुपकर यांनी महाविकास आघाडीमध्ये जावे, असे त्यांच्या सहकाऱ्यांचा आग्रह होता. त्यानुसार तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या पवार भेटीमुळे ते महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षात जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे.