
अर्थसंकल्प सादर करताच अजित पवार यांचा जयंत पाटील यांना शह, अर्थसंकल्प सादर करताना नेमके काय घडले?

मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार नुकताच विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. पण हा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी जयंत पाटील यांचा पराभव केला आहे.

महाराष्ट्रात आजपर्यंत ७८ वेळा अर्थसंकल्प सादर झाले असून त्यात विद्यमान अर्थमंत्री अजित पवार हे दुसऱ्या स्थानी आहेत. अजित पवारांनी आजपर्यंत त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात ११ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. जयंत पाटील यांनी १० अर्थसंकल्प सादर केले होते. पण यंदाचा अर्थसंकल्प सादर करत अजित पवार यांनी जयंत पाटील यांन मागे टाकले आहे. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात कधीच सख्य दिसून आलेले नाही. त्यामुळे अजित पवार यांनी कोठे का होईना जयंत पाटील यांना शह दिला आहे. महाराष्ट्राचा इतिहास पाहता आजपर्यंत सादर झालेल्या एकूण ७८ अर्थसंकल्पांपैकी सर्वाधिक १३ अर्थसंकल्प हे माजी अर्थमंत्री दिवंगत बॅ. शेषराव वानखेडे यांनी सादर केले आहेत. जर फडवणीस सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडेच अर्थमंत्री पद राहिल्यास अजित पवार लवकरच राज्यात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री होऊ शकतात. यासाठी त्यांना अजून तीन अर्थसंकल्प सादर करावे लागणार आहेत.
अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री
बॅ. शेषराव वानखेडे – १३
अजित पवार – ११
जयंत पाटील – १०
सुशीलकुमार शिंदे – ९
बॅ. रामराव आदिक – ७
सुधीर मुनगंटीवार – ६
मधुकरराव चौधरी – ५
यशवंतराव मोहिते – ४
एकनाथ खडसे – ३
स. गो. बर्वे – २
महादेव शिवणकर – २
दिलीप वळसे पाटील – २
शंकरराव चव्हाण – १
देवेंद्र फडणवीस – १
गोपीनाथ मुंडे – १
सुनील तटकरे – १
डॉ. व्ही. सुब्रह्मण्यम – १









