पुण्यानंतर आता ‘या’ ठिकाणी पोलिसांना सापडली तब्ब्ल दीड कोटींची रोकड ; घटनेने पुन्हा एकदा मोठी खळबळ

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. आचारसंहिता काळात कोणताही गैरव्यवहार होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

राज्यात येणा-या जाणा-या गाड्यांची तपासणी केली जात आहे. असे असतानाही जळगावच्या अमळनेर तालुक्यात तपासणी नाक्यावर एका कारमध्ये दीड कोटी रुपयांची रक्कम आढळून आल्याने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कासोदा गावातील फरकांडे चौफुलीवर पोलिसांचे पथक बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास नाकाबंदीसाठी थांबलेले होते. याचवेळी एका क्रेटा कारची तपासणी केली असता पोलिसांना तब्बल एक कोटी ४५ लाखाची रोकड सापडली.

दरम्यान रात्री उशिरापर्यंत ही रोकड नेमकी कोणाची आणि कशासाठी आणली होती? याचा खुलासा होऊ शकला नाही. या प्रकरणाचा पोलीस शोध घेत आहेत. परंतु या कारमधील रोकड एका बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचीही जोरदार चर्चा आहे.