यवत प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत,सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे,अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी महायुती करत तसेच उद्धव ठाकरे,शरदचंद्रजी पवार,नाना पटोले यांनी महाविकास आघाडी स्थापन करून विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण केली.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यातील मतदारांनी भरघोस मतदान देत महायुतीच्या बड्या बड्या नेत्यांना मतदारांनी अक्षरशः जमिनीवर पाय ठेवायला लावले.
दौंड तालुक्याच्या राजकारणात राज्यात घडलेल्या घडामोडीचा मोठा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाला आहे.दौंड तालुक्यात शरदचंद्र पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी तळ ठोकून प्रचार केला होता.राज्याच्या राजकारणातील नीतिमत्तेची घसरलेली पातळी मतदारांनी ओळखून तालुक्यात महाविकास आघाडीला विजय मिळवून दिला दिला असावा अशी चर्चा निकालानंतर चर्चेत होती.लोकसभा निवडणुकीत एका बाजूला तालुक्यातील दिग्गज नेते महायुतीचा प्रचार करताना दिसून आले तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या प्रचार दौऱ्यांना घोंगडी बैठकीप्रमाणे कार्यकर्त्यांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला,परंतु नेते एकीकडे आणि मतदार एकीकडे अशी परिस्थिती लोकसभेच्या निकालानंतर पाहायला मिळाली.
शरदचंद्र पवार,सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याकडे सर्वसामान्य जनतेची सहानुभूती असल्याचे पाहायला मिळाली.लोकसभेच्या प्रचार दौऱ्या दरम्यान सुप्रिया सुळे रोहित पवार यांना “हा संघर्षाचा काळ आहे आम्ही सोबत आहोत परंतु निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यातील जे नेते महायुतीचा प्रचार करत होते त्यांना कदापी महाविकास आघाडीमध्ये घेऊ नये”अशी मागणी कार्यकर्ते करत होते. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणूक दारावर आहे.लोकसभेला महाविकास आघाडी विरोधात काम केलेले बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या तुतारी या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक आहेत,परंतु शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आयात उमेदवार मान्य करणार नाही अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
वरवंड येथील दीपक दिवेकर यांनी दौंड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आयात कार्यकर्ते मान्य करणार नाहीत. संघर्षाच्या काळात ज्यांनी आपल्या विरोधात काम केले अशा लोकांना पुन्हा डोक्यावर घेऊन नाचण्याची आमची अजिबात इच्छा नाही, जे गेले ते गेले जे राहिले ते आपले मावळे आहेत, विधानसभेला तुतारी चिन्हावर आयात उमेदवार दिल्यास वरवंड येथील सर्व कार्यकर्ते अख्खा गट घेऊन विरोधक उमेदवाराचे खुलेआम,छाती ठोक काम करू, काही झाले तरी आयात उमेदवार कदापि मान्य करणार नाही असे यावेळी दीपक दिवेकर यांनी सांगितले.कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांसाठी अथवा पक्षासाठी भांडणें केली आहेत,स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले आहेत.तेच नेते एकमेकांना पेढे भरवत असतील तर कार्यकर्त्यांनी आत्ताच विचार करावा असे दीपक दिवेकर यांनी सांगितले आहे.
वरवंड गावाने तुतारी चिन्हाला ११८५ मतांचे मताधिक्य दिले आहे. हा आकडा संघर्षातून मिळालेल्या विजयाचा आहे.या विजयासाठी आम्ही घरोघरी पोहोचून अथक परिश्रम करत प्रचार केला आहे.जनतेने ज्यांना नाकारले त्यांच्या उमेदवारीस कार्यकर्त्यांचा विरोध-दीपक दिवेकर