
एक्झिट पोल समोर, चक्रावून टाकणारी आकडेवारी, पहा कोणाला किती जागा मिळणार?*काँग्रेस इतक्याच जागा?

दिल्ली – दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. मतदानानंतर सर्व एक्झिट पोल समोर आले आहेत.अनेक एक्झिट पोल जाहीर होत आहेत. यामध्ये संमिश्र कल दाखवण्यात आला आहे. पण बहुतांश पोलमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचे दिसून आले आहे. हा आपसाठी मोठा धक्का आहे.

दिल्लीच्या ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मतदान झाल्यानंतर आता अनेक पोल समोर आले आहेत. यामध्ये मॅट्रीझ या संस्थेने दिलेल्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला ३२-३७ जागा, भाजपला ३५-४० जागा तर काँग्रेसला ०-१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. चाणक्य स्ट्रॅटेजी या संस्थेच्या मते या निवडणूकीत आम आदमी पक्षाला २५-२८ जागा, भाजपला ३९-४४ जागा आणि काँग्रेसला २-३ जागा मिळण्याची शक्यता आहे. पी मार्क या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला २१-३१ भारतीय जनता पक्षाला ३९-४९ आणि काँग्रेसला १ जागा मिळेल असा अंदाज आहे. पोल डायरी या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला १८-२५, भाजपला ४२- ५० आणि काँग्रेसला ०-२ एवढ्या जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. वी प्रिसाईड या एक्झिट पोलने मात्र वेगळा अंदाज वर्तवला आहे. यात आम आदमी पक्षाला ४६-५२,भाजपला १८-२३ आणि काँग्रेसला ०-१ मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. एकूणच भाजपा २६ वर्षानंतर दिल्लीत सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान आम आदमी पक्षासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. तर भाजप आणि काँग्रेसही निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होईल याबाबत झी न्युजने केलेल्या सर्वेक्षणात दिल्लीतील ५० टक्के लोक पुन्हा अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित आहेत. तर भाजपचे प्रवेश वर्मा यांना ३० टक्के तर काँग्रेसचे संदीप दीक्षित यांना २० टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. मात्र अंतिम निकाल ८ तारखेला समोर येणार आहे.









