
दिल्लीत मोदी फॅक्टर तिस-यांदा फेल? काँग्रेसच्या पदरी पुन्हा अपयशच? पहा कोणाला किती जागा?

दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. दिल्लीत यावेळी तिरंगी लढत होत आहे. आम आदमी पार्टी (आप), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. पण खरी लढत ही आप आणि भाजपात होत आहे.

निवडणुकीपूर्वी विविध पक्षांच्या स्थितीचा ओपिनियन पोलच्या माध्यमातून अंदाज लावला जात आहे. आता इंडिया डेली लाईव्हने केलेला सर्व्हे समोर आला आहे. यानुसार दिल्लीत पुन्हा आपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. पण आपच्या जागांमध्ये घट होणार आहे. तर भाजपा एक विरोधी पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. तर यंदाही काँग्रेसला भोपळा मिळण्याची शक्यता आहे. एकूणच मोफत वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणा या पक्षाच्या लोककल्याणकारी योजनांचा आपला फायदा होताना दिसत आहे. केंद्रात भाजपाची सत्ता असल्यामुळे आणि निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनामुळे भाजपाच्य जागा वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसनेही यावेळेस आपले जुने दिवस परत येण्यासाठी काही नवीन रणनीती अवलंबल्याचे दिसत आहे. मात्र आजपर्यंत पक्षाला लोकांमध्ये फारसे आकर्षण निर्माण करता आलेले नाही.
कोणाला किती जागा? मतदान टक्केवारी
आम आदमी पार्टी (आप): ५०-५५ जागा (५१.२०)
भारतीय जनता पार्टी (भाजप): १५-२० जागा(४१.८०)
काँग्रेस: ०० जागा(०४.००)
इतर: ०० जागा(०२.९०)









