
हिंगोली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोलीमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला त्याच्या आईने चांगलाच धडा शिकवला आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील केळी गावात हि घटना घडली आहे.

सोशल मीडियावर वादग्रस्त मजकूर टाकल्याने एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे, परंतु पोलीस गावात येण्यापूर्वीच त्या तरुणाच्या आईला ही गोष्ट कळाली. त्यानंतर आईने या तरुणाला पोलिसांसमक्ष व गावकऱ्यांसमक्ष तंबी देत चांगलाच चोप दिला आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल या तरुणाच्या आईनं तरुणाला तंबी देत त्याला चारचौघात कान धरायला भाग पाडलं, एवढंच नाही तर त्याला चोप देखील दिला आहे. सामाजिक वातावरण बिघडवणारी अशी पोस्ट का केलीस? म्हणत आईने व मोठ्या भावाने या तरुणाचे चारचौघात कान पकडले आहेत. एक चांगला आदर्श या आईने घालून दिला आहे. या घटनेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.









