धडक दिली आणि कितीतरी किलोमीटर गाडी फरफटत नेली,अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

गेल्या वर्षी दिल्लीतील कंझावाला भागात एका तरुणीला भरधाव कारने कैक किलोमीटर फरफटत नेल्याची घटना घडली होती. त्या घटनेत तरुणीचा कारखाली चिरडून मृत्यू झाला. तशाच प्रकारची घटना हैदराबादमध्ये घडली आहे.एका ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली आणि त्याची दुचाकी फरफटत नेली. सुदैवाने दुचाकीस्वाराने ट्रकचे दार पकडून स्वतःचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दुचाकीला धडक दिल्यानंतर चालकाने ट्रक न थांबवता तशीच पळवली. यावेळी दुचाकी ट्रकच्या चाकात अडकली, तर दुचाकीस्वाराने कसेबसे स्वतःला वाचवले. व्हिडिओमध्ये दुचाकी रस्त्यावर घासल्यामुळे ठिणग्या निघताना दिसत आहेत. रस्त्याने प्रवास करणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीस्वाराने या घटनेचा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट केला. यावेळी इतर दुचाकीस्वारांनी त्या ट्रकचालकाला थांबवण्याचा इशारा दिला, पण त्याने ट्रक थांबवली नाही.

व्हिडिओ पहा – टूव्हीलरला धडक दिली आणि कितीतरी किलोमीटर गाडी फरफटत नेली,अंगावर काटा आणणारा व्हिडीओ