
मैत्रिपूर्ण ओळखी वरुन केलेली मारहाण, पत्नीकडे सतत घेत असलेला संशय यावरुन होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी त्यांनी जबरी चोरीचा बनाव करुन पतीवर वार करुन त्याचा खून केला. परंतु, हा बनाव पोलिसांनी अवघ्या १० तासात दूर करुन एकाला अटक केली.

चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यु झाल्याचा बनाव अमोल याच्या पत्नीने केला होता. तिला वाटत होते की आपला बनाव पचला़ पण, वेगवेगळ्या पोलीस अधिकार्यांनी कसा घडला प्रकार हे सांगताना तिने दोन चोरटे असल्याचे सांगितले. तर सीसीटीव्हीमध्ये एकच जण आलेला दिसत होता. त्यांच्या एका मुलीने पहाटेच्या सुमारास चोरटा ओळखीचा वाटत असल्याचे सांगितले. दोन मुली घाबरुन घरातच बसल्या होत्या. त्याचवेळी पोलिसांना प्रसन्न कोकरे याच्याविषयी माहिती मिळाली. प्रसन्न कोकरे याचे नाव घेताच अमोल याच्या पत्नीच्या चेहर्यावरील हावभाव बदलले़ आणि पोलिसांचा संशय खरा ठरला. तोपर्यंत गुन्हे शाखेच्या पथकाने प्रसन्न कोकरे याचा ठावठिकाणी काढला होता. तो सिंहगड रोडवरील घराजवळ आल्याचे दिसून येताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने गुन्हा कबुल केला.

निवंगुणे याच्या पत्नीशी त्याची मैत्रीपूर्ण ओळख होती. त्यावरुन अमोल याने प्रसन्न कोकरे याला मारहाणही केली होती. अमोल पत्नीला आरोपीच्या नावाने संशय घेत होता. अमोल याने केलेली मारहाण व मैत्रीपूर्ण संबंधात अडथळा ठरलेल्या अमोल याला संपविण्यासाठी त्यांनी जबरी चोरीचा बहाणा करुन त्याचा खून केला. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने आरोपीला पुढील कारवाईसाठी वारजे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकावडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, हवालदार सयाजी चव्हाण, हवालदार गणेश ढगे, दुर्योदन गुरव, पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, महेश पाटील, साईकुमार कारके, अंकुश भिसे यांनी केली़ या तपासात वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे व तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सहकार्य केले.









