प्रसिद्ध अभिनेत्रीला न्यायालयाचा मोठा दणका

Oplus_131072

या अभिनेत्यावर दाखल केलेला गुन्हा केला रद्द, अभिनेत्रीला मोठा धक्का, म्हणाली….

मुंबई – जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना ‘मी टू’प्रकरणी अखेर दिलासा मिळाला आहे. तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात दाखल केलेली जनहित याचिका मुंबई न्यायालयाने फेटाळून लावली आहे. लैंगिक छळाचा आरोप झाल्याप्रकरणी नाना पाटेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबामुळे आरोपांची दखल घेता येणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत कोर्टाने आपले मत नोंदवले आणि याचिका निकाली काढली. तनुश्री दत्ताने नंतर पुढील तपासाची विनंती करून याचिका दाखल करून पोलिस अहवालाला आव्हान दिले. तथापि, तक्रार दाखल करण्यास झालेल्या मोठ्या विलंबामुळे खटला पुन्हा उघडता येत नाही, असा निकाल दंडाधिकाऱ्यांनी दिला. परिणामी अभिनेता नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य , दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्याविरोधात २००८ मध्ये लैंगिक छळ आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या तपास अहवालाची दखल घेत न्यायालयाने तक्रार कोणत्या आधारावर करण्यात आली आणि या संदर्भात पोलिसांनी न्यायालयात सादर केलेला अहवाल काय आहे हे शोधून काढले. त्या आधारावर कोणावरही गुन्हा दाखल करता येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या तपास अहवालाची दखल घेत न्यायालयाने सध्या तरी ही तक्रार फेटाळून लावली आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी २०१८ मध्ये नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ती म्हणाली होती की, २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले होते.