५ वर्षीय मुलाला निर्दयी बापाने इमारतीवरुन खाली फेकले, खाली उभ्या असलेल्या व्यक्तीने बघितले अन्…..

उत्तर प्रदेशातील देवरिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निर्दयी बापाने आपल्या 5 वर्षीय मुलाला मेडिकल कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकून दिले. सुदैवाने खाली उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मुलाला आपल्या हातात झेलले आणि त्याचा जीव वाचवला.

यानंतर लोकांनी आरोपी बापाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. मिळालेल्या माहितीनुसार, गौरी बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोपरी येथे राहणारा विनय प्रसादला अंमली पदार्थांच्या आहारी गेला आहे. त्याचा 5 वर्षीय मुलगा लकी हर्नियाने त्रस्त होता, त्यामुळे त्याची आईने त्याला महर्षी देवराह बाबा मेडिकल कॉलेजमध्ये ऑपरेशनसाठी भरती केले होते. रविवारी सकाळी पती-पत्नीचे भांडण झाले, ज्यामुळे आरोपी बापाने मुलाला लघवी करण्याच्या बहाण्याने खिडकीजवळ नेले आणि खाली फेकले.

सुदैवाने खाली उभ्या असलेल्या व्यक्तीने त्या मुलाला हातात झेलले. यानंतर मुलाला तात्काळ इमर्जन्सी वॉर्डात नेले. तर, तिथे जमलेल्या लोकांनी आरोपी बापाला बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी दिलीप सिंह यांनी सांगितले की, आरोपी वडिलांना ताब्यात घेण्यात आले, परंतु त्याच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार नोंदवली नाही, त्यामुळे आरोपीला सोडून देण्यात आले आहे.