चॅम्पियन ट्राॅपीच्या अंतिम सामन्यावर पाच हजार कोटीचा सट्टा

भारत न्यूझीलंड दरम्यान होणार अंतिम सामना, सट्टेबाजांची फेव्हरेट टीम कोणती? कोण जिंकणार?

मुंबई – सध्या सुरु असलेल्या चॅम्पियन ट्राॅपीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या सामन्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे. क्रिकेटप्रेमींबरोबर सट्टेबाजाराचें लक्ष उद्याच्या सामन्यावर असणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल महामुकाबला भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्या दुबईत होणार आहे.भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, साखळी सामन्यामध्ये भारताने बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचा पराभव केला. तर उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टीम इंडियाने फायनल गाठली. तर न्यूझीलंडनी उपांत्यफेरीत साऊथ आफ्रिकेचा पराभव केला. साखळी सामन्यात भारताबरोबरचा पराभव सोडल्यास न्यूझीलंड देखील पराभूत झालेली नाही. त्यामुळे उद्याच्या फायनलसाठी सट्टाबाजार देखील तेजीत आला आहे. जगभरातील प्रमुख बुकी दुबईमध्ये आले आहेत. दिल्लीसह भारतातील सर्व प्रमुख बुकी दुबईमध्ये बसून क्रिकेटवर सट्टा लावतात अशी माहिती देखील समोर आली आहे. उद्याच्या सामन्यासाठी पाच हजार कोटींची उलाढाल होणार आहे. त्यामुळे उद्या पोलीस देखील सतर्क असणार आहेत. दरम्यान चॅट जीपीटीने चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलसाठी भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ५५ टक्के तर न्यूझीलंडची विजयी टक्केवारी ४५ टक्के वर्तवली आहे. डीपसीकने वर्तवलेल्या अंदाजानुसार भारताच्या विजयाची टक्केवारी ६०% आहे, तर न्यूझीलंडची विजयी टक्केवारी ४०% आहे.

उद्या होणाऱ्या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे, कारण या स्पर्धेत भारताने अजून एकही सामना गमावलेला नाही, तर दुसरीकडे न्यूझीलंडला मात्र भारताकडून पराभूत व्हावे लागले होते.