दहावीचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार?

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, समोर आली नवीन तारीख

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा मार्च महिन्यात संपल्या असून आता निकालाची प्रतिक्षा आहे. त्यातच तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

या वर्षीही निकाल १५ मे’च्या आधीच निकाल लावण्याची तयारी बोर्डाची आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एसएससी म्हणजे दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. मार्च महिन्यात ही परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. शिक्षण विभागाकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू आहे. यावर्षी १५ मे पूर्वीच निकाल लावण्याची तयारी बोर्डाने केल्याचे सांगण्यात येत आहे. बोर्डाने विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं आयोजन लवकर केल्यानं परीक्षा लवकर संपल्या. त्यामुळे निकालही लवकर लावले जाणार आहेत. निकालानंतर जुलैच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षा होणार असल्याचंही सांगण्यात येतंय. दहावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. बोर्डाकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवलं गेले होते. त्यात राज्यात दहावीच्या परीक्षेत ८९ आणि बारावीच्या परीक्षेत ३६० गैरप्रकारांची नोंद झाल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. राज्यभरात एकूण ५००० परीक्षा केंद्रे होती. या परीक्षा फेब्रुवारी २०२५ आणि मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल्या होत्या.

निकालांबाबत बोर्डाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु गेल्या काही वर्षांचा ट्रेंड पाहता, दहावी आणि बारावीचे निकाल मे महिन्यात जाहीर केले जाऊ शकतात. गेल्या २ वर्षांचा ट्रेंड पाहिला तर, १०वी आणि १२वीचे निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होत आहेत.